Guinness World Record : मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक बनले आहेत. 22 सप्टेंबर रोजी, अभिनेत्याला त्यांच्या 45 वर्षांतील 156 चित्रपटांमधील 537 गाण्यांमध्ये 24000 नृत्य चाली सादर केल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ही तारीख सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. 22 सप्टेंबर हा दिवस चिरंजीवी यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण याच दिवशी साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी 1978 मध्ये भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
गेल्या 45 वर्षात चिरंजीवी यांनी 156 चित्रपटांतील 537 गाण्यांमध्ये 24,000 डान्स स्टेप्स केल्या आहेत. यासाठीच त्यांना हा सन्मान मिळाला आहे. चिरंजीवींचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट होताच भारतातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसतो आहे. दरम्यान, अभिनेत्याला हा सन्मान इतर कोणी नसून बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने दिला आहे.
22 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये आमिर खानने चिरंजीवी याना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देऊन त्यांचे कौतुक केले. बॉलीवूड सुपरस्टारने प्रेम आणि आदराचे प्रतीक म्हणून भारतीय सिनेमाच्या मेगास्टारला मिठी मारली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये चिरंजीवीसाठी केलेल्या भाषणात आमिर म्हणाला, ‘येथे येणे माझ्यासाठी आनंद आणि सन्मान आहे. चिरंजीवी गरुचे चाहते पाहून मला आनंद झाला आणि मला तुमच्यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो कारण मी त्यांचा मोठा चाहता आहे.’
आमिर खानने केला गौरव
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुढे म्हणाला, ‘मी त्यांच्याकडे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे पाहतो. जेव्हा चिरंजीवी गरु यांनी मला फोन केला आणि मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले, तेव्हा त्यांनी मला का बोलावले ते मला माहित नाही आणि मी त्यांना आधीच सांगितले होते की, तुम्ही फक्त मला ऑर्डर द्या, मी हजर होईल. चिरंजीवी गरू यांना हा सन्मान मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. या अद्भुत संध्याकाळचा आणि उत्सवाचा भाग बनून मला खूप आनंद झाला आहे.’ असे अमीर खानने म्हंटले आहे.
चिरंजीवी यांनी व्यक्त केल्या भावना
या कार्यक्रमात संबोधित करताना चिरंजीवी म्हणाले, ‘मला कधीच वाटले नव्हते की मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक होईल. मात्र, मला हा मान मिळाला त्याचा मला आनंद आहे. चिरंजीवी यांच्या भाषणानंतर उपस्थितीत लोकांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले.