बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मुहम्मद युनूस यांच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी “गो बॅक” चे नारे दिले. न्यूयॉर्कमधील ज्या हॉटेलमध्ये मुहम्मद युनूस मुक्कामी होते, त्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव आला आणि त्यांच्याकडून ‘गो बॅक’चे नारे देण्यात आले. मुहम्मद युनूस हे 79 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्यांबाबत निषेध व्यक्त करत येथील लोकांनी मुहम्मद युनूस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हॉटेल बाहेर जमलेल्या जमावाने “स्टेप डाउन, स्टेप डाउन, स्टेप डाउन” अशी घोषणाबाजी करत “शेख हसीना आमच्या पंतप्रधान” असे पोस्टर्स हातात धरले होते.
शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर मुहम्मद युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. ८४ वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते हसीना यांच्यानंतर सत्तेवर आले. यानंतर विरोधकांनी मुहम्मद युनूस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
“मुहम्मद युनूस यांनी असंवैधानिक, बेकायदेशीरपणे सत्ता हातात घेतली, त्यांनी गलिच्छ राजकारण करून सत्ता काबीज केली. आतापर्यंत आमच्या निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला नाही. असे यावेळी आंदोलकांनी एएनआयला सांगितले.
एएनआयशी बोलताना, आंदोलक म्हणाले, “आमची मागणी शांतता आहे. आमचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांनी बळजबरीने सत्ता हाती घेतल्यानंतर, तेथील लोकांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना मारण्यास सुरुवात केली, येथे अल्पसंख्याकांवर अजूनही अत्याचार केले जात आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत, मंदिरे, चर्च देखील तोडले जात आहेत.
पुढे आणखी एका आंदोलकाने म्हंटले, “मी बांगलादेशातील 117 दशलक्ष लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेकायदेशीर, निवडून न आलेल्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी येथे आलो आहे…ते निवडून आलेला नाहीत, त्यांची नियुक्ती विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांना अल्पसंख्याकांची किंवा कोणाचीही पर्वा नाही. त्यांनी देशावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे…” असे अनेक आरोप येथे जमलेल्या आंदोलकांनी मुहम्मद युनूस यांच्यावर लावले केले.