ऑक्टोबर (October ) महिन्यात जवळपास १५ दिवस सर्व बँकांना सणांमुळे सुट्टी (Bank Holiday) असणार आहे. गांधी जयंती पासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण ऑक्टोबर महिन्यात येत आहेत. RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबरच्या ३१ दिवसांपैकी १५ दिवस बँक बंद असणार आहेत. अशा स्थितीत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्या पाहून बँकेसंबधीत सर्व कामे करण्यासाठी घराबाहेर पडावे लागेल.
रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुकीमुळे ऑक्टोबरमध्ये एक दिवस बँकेला सुट्टी राहणार आहे. तसेच गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, काटीबिहू आणि दिवाळीनिमित्त बँकेना सुट्टी असणार आहे.
1 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद असणार आहेत. गांधी जयंती निमित्त देशभरातील बँक 2 ऑक्टोबर 2024 बंद असणार आहेत.नवरात्रीच्या स्थापनेमुळे 3 ऑक्टोबर 2024 रोजी बँकांना सुट्टी असेल. साप्ताहिक सुट्टी रविवारी 6 ऑक्टोबरला असणार आहे. तसेच महासप्तमीमुळे १० ऑक्टोबरला बँका बंद असतील, 11 ऑक्टोबरला महानवमी, 12 ऑक्टोबरला दसरा आणि दुसरा शनिवार, 13 ऑक्टोबरला साप्ताहिक सुट्टी, 14 ऑक्टोबरला दुर्गा पूजा, 16 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजा या निम्मिताने बँका बंद राहणार आहेत.
याचसोबत 17 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती, 20 ऑक्टोबरला साप्ताहिक सुट्टी, 26 ऑक्टोबरला प्रवेश दिवस (जम्मू आणि काश्मीर) आणि चौथा शनिवार, 27 ऑक्टोबरला साप्ताहिक सुट्टी ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आणि दिवाळीमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे.
दरम्यान, या कालावधीमध्ये जर लोकांना महत्वाचे काही काम असेल तर ते UPI, नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगचा वापर करून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. तसेच एटीएमचा वापर करून देखील पैसे खात्यातून काढू शकतात.