स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्त माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन नवी मुंबई (Mumbai ) येथे करण्यात आले होते. आज हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण अधिकारी झाले आहेत. तसेच आज मराठा तरुण (Maratha Reservation) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे लोकांना नोकरी देत आहेत असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना केलेला आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत कोणती कोणती कामे केलेली आहेत. त्या सर्व कामांचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील कार्यक्रमात बोलताना दिला आहे. राज्यात 25 हजारांची पोलीस भरती करण्यात आली आहे. यामुळेच मराठा तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तसेच मराठा समाजाला नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत हाच आमच्या सरकारचा नेहमी प्रयत्न राहणार आहे असे भाष्य त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थी आयएएस, आयपीएस अधिकारी बनावेत यासाठी सारथी संस्था सुरु करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 51 विद्यार्थी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. सारथी संस्थेमुळे आमचे कल्याण झाल्याची भावना समाजात आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले आहेत. याचसोबत सारथी संस्थेमुळे आतापर्यंत 18 विद्यार्थी आयपीएस अधिकारी बनले आहेत तर 12 आयएएस अधिकारी बनले आहेत अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे .
दरम्यान, मराठा समाजात उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केले आहे. याच्या माध्यमातून 1 लाख मराठा तरुण उद्योजक बनले आहेत असे वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले आहे.