Maharashtra Weather Alert : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, पुढील काही दिवस देखील अशाच पावसाची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली असून, आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आले आहेत.
कोकण मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टीसह पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज मुंबई-पुण्यासह काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील काही ठिकाणी ऑरेंज, यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या भागात काय अलर्ट?
रेड अलर्ट : पुणे, रत्नागिरी, रायगड
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
यलो अलर्ट : धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव