Mumbai-Pune Rain : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. पुण्यासह-मुंबईमध्येही (Pune-Mumbai) जोरदार पाऊस कोसळत आहेत. हवामान खात्याने (India Meteorological Department) गुरुवारी मुंबईसह-पुण्याला देखील पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. याच पार्श्ववभूमीवर मुंबई पुण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जारी केलेल्या निवेदनात, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच मुंबई पोलिसांनी देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर, करत नागरिकांना गरजेशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100 डायल करा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Mumbai Police tweets, "In view of the Red alert in Mumbai & suburbs, issued by IMD, a holiday has been declared for all schools & colleges for tomorrow, 26th September 2024. Mumbaikars are requested to stay indoors, until essential. Please stay safe. Dial 100 in case of any… pic.twitter.com/fKJAT4IFUW
— ANI (@ANI) September 25, 2024
‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
राज्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याने पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच विविध ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुण्यातील शाळांना सुट्टी
पुणे जिल्ह्यातही हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवस यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
एवढेच नाही तर पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक उड्डाणे वळवण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.