इस्रायल(Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या गंभीर संघर्षामुळे लेबनॉनच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी रॉकेट, मिसाइल्स आणि मोठ्या प्रमाणात बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर(Lebanon) एका पाठोपाठ एक हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात हिज्बुल्लाहची 90 टक्के सैन्य शक्ती चार दिवसांच्या हल्ल्यामध्ये इस्रायलने संपवलेली आहे.
तसेच आता “लेबनॉनमधील जनतेने हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना आपल्या घरात मिसाइल आणि दारुगोळा ठेवायची परवानगी दिली, तर त्यांची घर उद्धवस्त होणार हे निश्चित” असा इशारा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉनमधील लोकांना दिला आहे. इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉन देश पूर्णपणे ताब्यात घेणार आहे यामुळेच लोकांनी दक्षिण लेबनॉन लवकरात लवकर सोडावे असे आवाहन करणारे पत्रक आय. डी. एफने (Israel Defense Forces) दिले आहे.
दरम्यान, इस्रायलने हिज्बुल्लाहवर मिसाइल हल्ला केला असून यामध्ये हिज्बुल्लाहचे निम्मे सैन्य संपुष्ठात आले आहे. इस्रायलने हिज्बुल्लाहवर केलेल्या हल्ल्याचा एक दिवसाचा खर्च 1500 कोटी रुपये आहे. या हल्ल्याला ‘ऑपरेशन नॉर्दर्न ॲरो’ असे नाव देण्यात आले आहे. इस्रायलने याआधी हिज्बुल्लाहवर हवाई हल्ले केले होते यानंतर आता इस्रायलने हिज्बुल्लाहच्या जमिनीवरील सैन्यावर हल्ले केले आहेत.
आय. डी. एफ कडून (Israel Defense Forces) याचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये हिज्बुल्लाहच्या टॉप लीडरशिपमध्ये फक्त तीन लोक उरले आहेत असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिज्बुल्लाहकडे 1 लाख 40 हजार रॉकेट आणि मिसाइलचा साठा होता परंतु या हल्ल्यात हिज्बुल्लाहची 70 हजार रॉकेट, मिसाइल, 50 टक्के शस्त्र, तसेच लॉन्च पॅड जळून खाक झाल्याची माहिती आय. डी. एफने रिपोर्टमध्ये दिलेली आहे.