BAPS Mandir : अमेरिकेतील BAPS (BAPS Mandi) हिंदू मंदिरांना पुन्हा एकदा लक्ष करण्यात आले. कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो (Sacramento) येथील एका मंदिराच्या भिंतीवर हिंदुविरोधी संदेश लिहिण्यात आला. एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये असलेल्या हिंदू मंदिराची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली तसेच मंदिराच्या भिंतींवर “हिंदू परत जा” अशा सूचना लिहिण्यात आल्या.
या प्रकरणाची माहिती देत BAPS जनसंपर्क विभागाने ‘X’ वर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हिंदूंबद्दलच्या या द्वेषाविरोधात आम्ही एकजूट आहोत, असे म्हटले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “न्यूयॉर्कमधील BAPS मंदिरातील विटंबनाच्या घटनेला 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीनंतर, ही घटना काल रात्री सॅक्रामेंटो येथील मंदिरात घडली आणि मंदिरांच्या भिंतींवर “हिंदू गो बॅक” अशा घोषणा लिहिण्यात आल्या.’
US: BAPS Mandir in Sacramento vandalised with anti-Hindu messages
Read @ANI Story | https://t.co/II3TgdBbGr#US #BAPS #Sacramento #Mandir pic.twitter.com/8cv9zgdP6I
— ANI Digital (@ani_digital) September 26, 2024
त्याचवेळी BAPS या हिंदू संघटनेने हल्ल्याच्या या घटनेबाबत एक निवेदन सादर केले. या निवेदनात म्हंटले आहे की, “आम्ही हिंदूंविरोधात होत असलेल्या या द्वेषाचा निषेध करतो. या घटनेमुळे दुःखी आहोत. BAPS कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसह या द्वेषपूर्ण गुन्ह्यावर जवळून काम करत आहोत. कट्टरपंथियांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘सॅक्रामेंटो येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे हिंदू समुदायाचे घर आहे जे मोठ्या समुदायासाठी अनेक उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहे. आम्ही या समाजाचा अविभाज्य भाग आहोत आणि राहू.”
न्यूयॉर्कमधेही मंदिराची तोडफोड करण्यात आली
याआधी 16 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील BAPS स्वामीनारायण मंदिरातही हल्ला आणि तोडफोडीची घटना समोर आली. न्यूयॉर्कमधील मेलविल येथील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर रस्त्यावर आणि फलकांवर हिंदूंविरोध अपशब्द लिहिलेले होते.