भारतात बनावट कागदपत्रांच्या आधारे राहिल्याने पॉर्नस्टार रिया बर्डेला (Riya Barde ) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रिया बर्डे बांगलादेशची(Bangladesh) असल्याची माहिती मिळालेली आहे. आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावांनी देखील ती ओळखली जाते. तिची आई बहीण आणि भाऊ भारतात बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत आहेत. तिच्या आईने अमरावतीमधील एका व्यक्तीशी लग्न देखील केले आहे आणि हे लग्न भारतात राहता यावे म्हणून केले आहे असा आरोप केला जात आहे.
रिया बर्डे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) प्रॉडक्शनशी निगडीत आहे तसेच तिने पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रियाचे आई आणि वडील सध्या कतारमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे तर रियाचे बहीण भाऊ कुठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वेश्या व्यवसाय प्रकरणी रिया बर्डेला यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक संग्राम माळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. रिया बर्डेने बनावट जन्माचा दाखला आणि इतर बनावट कागदपत्रे काढून भारतीय पासपोर्ट देखील काढला आहे. रियाच्या आईने भारतात राहता यावे म्हणून अमरावतीमधल्या अरविंद बर्डेशी लग्न केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला याबाबत माहिती मिळाली होती. यानंतर त्याने रिया बांगलादेशी आहे असे पोलिसांना सांगितले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.
पोलिसांनी रियाची सर्व कागदपत्रे तपासून पाहिली कागदपत्रांची पडताळणी केली यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच पोलिसांनी रिया बर्डेला अटक केली आहे . या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करत असून पोलिसांनी आयपीसी कलम 420, 465, 468, 471, 34 आणि परदेशी कायदा अंतर्गत तिच्यावर आरोप दाखल केलेले आहेत.