PRIME MINISTER OF JAPAN : शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत जपानचे शिगेरू इशिबा यांची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या (एलडीपी) अध्यक्षपदी निवड झाली. यासह 67 वर्षीय इशिबा देशाचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील आठवड्यात ते देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधानांच्या शर्यतीत नऊ उमेदवार होते या उमेदवारांना मागे टाकत शिगेरू इशिबा देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. इशिबा यांना एकूण 215 मते मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धि टाकाईची यांना 194 मते मिळाली आहेत.
इशिबा खरं तर आपल्याच पक्षावर टीका करण्यासाठी आणि विरोधात जाण्यासाठी ओळखले जातात. यामुळे ते एलडीपीचे शत्रू तर झालेच, पण पक्षाशी निगडित तळागाळातील कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे ते लाडके बनले.
इशिबा यांचे राजकीय कौशल्य आणि देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणातील अनुभवामुळे त्यांना हे सर्वोच्च पद मिळाले आहे, आपल्या विजयासोबत इशिबा म्हणाले, ‘एलडीपी आता पुन्हा पुनर्जन्म घेऊ शकते आणि लोकांचा विश्वास पुन्हा मिळवू शकते.’
ते म्हणाले, “मी लोकांवर विश्वास ठेवीन, धैर्याने आणि प्रामाणिकपणे सत्य बोलेन आणि या देशाला एक सुरक्षित ठिकाण बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन जिथे प्रत्येकजण पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन जगू शकेल.”
इशिबा, फुमियो किशिदा यांची जागा घेतील
इशिबा आता पंतप्रधान फुमियो किशिदा यांची जागा घेतली, ज्यांनी ऑगस्टमध्ये पायउतार होण्याचे जाहीर केले होते. राजकीय घोटाळ्यांच्या मालिकेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला.