महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections 2024 ) भाजपच्या पराभवाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपला नुकसान झाले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १२ जागा कमी मतांनी गमावल्या, यामध्ये अजित पवारांचे (Ajit Pawar) मत हस्तांतरण साधले नसल्यामुळे या जागा गमवाव्या लागल्या असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“आम्हाला महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ २ लाख मते कमी पडली. २०१९ मध्ये आमच्या हातात २३ जागा होत्या, परंतु २०२४ मध्ये फक्त ९ जागा मिळाल्या.” असे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. भाजपच्या पारंपरिक मतदारांना राष्ट्रवादी सोबतची युती आवडत नसली तरी, ८० टक्के लोकांना युतीची गरज आहे हे समजले आहे असे देखील वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीसांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना सांगितले की, “गेल्या काही निवडणुका आमच्या दृष्टीने सर्वात वाईट कामगिरी ठरल्या आहेत .” राष्ट्रवादीच्या विरोधात लढणे हे एक आव्हान होते. आता, दोन्ही पक्षांनी आपली जागा स्थिर केली आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे.यापुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, , “राजकीय तडजोडी कधी-कधी आपल्या मतांच्या विरोधात असू शकतात, पण आवश्यक असल्यास पुढे जाणे महत्वाचे आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी युतीतील कार्यकर्त्यांना समजून सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने, फडणविसांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. फडणवीसांच्या वक्तव्याने आगामी निवडणुकांमध्ये युतीमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.