आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद (Press Conference ) घेतली होती. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार(Rajiv Kumar) आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे अद्याप निवडणूक आयोगाने सांगितलेले नाही. याबाबतची सर्व माहिती लवकर देऊ असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलेले आहे.
निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार (Rajiv Kumar) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणालेले आहेत की, अनेक राजकीय पक्षाशी आम्ही चर्चा केली असून सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा अशी मागणी अनेक पक्षांनी केलेली आहे. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा ११ राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे.
महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार असून देखील राज्यातील काही ठिकाणी अतिशय कमी मतदान होते. याठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणालेले आहेत. तसेच यावेळी मतदान करणाऱ्या नवीन मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे. ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र तर शहरात मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585 असणार आहेत. निवडणूकी दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर या निवडणुकीसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली आहे.