राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election )वाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांना महत्त्वाची शंका निर्माण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त राजीव कुमार((Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलेले आहे की , गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी लागेल.
यावेळी राजीव कुमार म्हणाले आहेत की , “उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांबाबत तीन वेळा वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन माहिती द्यावी लागेल. याशिवाय, संबंधित राजकीय पक्षांना उमेदवारी का दिली, याबाबत कारणे देखील द्यावी लागतील.” या निर्णयामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना खूपच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
याशिवाय, निवडणूक आयोगाची नजर पैशांच्या वितरणावर देखील असणार आहे. आयोगाने स्पष्ट केले की, पैसे, दारू, किंवा अन्य काही देऊन मतदारांचे मत घेण्याच्या प्रयत्नांवर कठोर कारवाई करण्यात येईल. “जिथे अशा प्रकार घडत आहेत, तिथे आम्ही लक्ष ठेवू,” असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात 288 विधानसभा जागा आहेत आणि या निवडणुकीत मतदारांची वाढती संख्या देखील महत्त्वाची ठरणार आहे. आयोगाने जोरदार उपाययोजना केल्याने यावेळी निवडणुकांची पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे राजकीय पक्षांमध्ये गोंधळ वाढला आहे, कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आता माहिती जाहीर करावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढणार आहे. आयोगाचे हे नवीन नियम मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.