Narendra Modi : आज २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राला ११ हजार २०० कोटी रूपयांचे प्रकल्प भेट दिले आहेत. तसेच आज त्यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटनही झाले. हा कार्यक्रम 26 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. मात्र, मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द करण्यात आला.
व्हिडिओ काँन्फरन्सवेळी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी अनेक विकास कामांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, भारत देश हा मुलभूत मुल्यांच्या अधारावर अधुनिक व्हावा, परंतु आपल्या मुलभूत मूल्यांच्या आधारावर भारताने आपला वारसा अभिमानाने घेऊन पुढे जावे आणि विकास करावा.’
यावेळी महाराष्ट्रातील विकास कामांसाठी शुभेच्छा देत असताना म्हणाले की, ‘आजपासून स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. पुढे त्यांनी सोलापूर विमानतळ याबद्दल देखील वक्तव्य केले, विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळाले असून सोलापूर विमानतळाचे काम सुरु आहे. आता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लोक सोलापूरला थेट विमानाने जाऊ शकतील.
पुढे, पंतप्रधानांनी बिडकीन औद्योगिक क्षेत्रही राष्ट्राला समर्पित केले. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 7,855 एकरमध्ये पसरलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित झालेल्या या प्रकल्पात मराठवाडा विभागातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून प्रचंड क्षमता आहे. केंद्र सरकारने तीन टप्प्यांत विकासासाठी एकूण 6,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
मोदींच्या हस्ते ‘या’ विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ, स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन.