Mithun Chakraborty : बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना दादासाहेब फाळके या पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना सिनेमॅटिक प्रवासासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 74 वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांची हिंदी चित्रपटसृष्टीत 48 वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. आणि ते अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मिथुन दा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देतो!!! तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देखील या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
Mithun Da’s remarkable cinematic journey inspires generations!
Honoured to announce that the Dadasaheb Phalke Selection Jury has decided to award legendary actor, Sh. Mithun Chakraborty Ji for his iconic contribution to Indian Cinema.
🗓️To be presented at the 70th National…
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 30, 2024
पद्मभूषण पुरस्काराचेही मानक
कोलकात्याच्या रस्त्यांवरून बॉलिवूड डिस्को डान्सर पर्यंतचा प्रवास ‘मिथुन दां’साठी अजिबात सोपा नव्हता. सिनेमात एक उंची गाठण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. आणि आता काही महिन्यांनी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
कधी केले चित्रपटांमध्ये पदार्पण?
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये एका छोट्या भूमिकेतून अभिनयाचा प्रवास सुरू केला. हा चित्रपट होता ‘दो अंजाने’, त्यानंतर त्यांना 1977 मध्ये लीड अभिनेता म्हणून मान्यता मिळाली. ‘मृगया’ या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना नेशन अवॉर्ड देखील मिळाला. 1982 मध्ये त्यांचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानंतर ते प्रसिद्धी झोतात आले. चित्रपटाने आशिया, सोव्हिएत युनियन, पूर्व युरोप, मध्य पूर्व, तुर्किये आणि आफ्रिकेत उत्कृष्ट व्यवसाय केला. अलीकडच्या काळात मिथुन दा ‘ओह माय गॉड’ सारख्या चित्रपटात दिसले होते.