Israel attacks Lebanon : इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाला हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर इस्त्रायली लष्कर आता लेबनॉनमध्ये घुसण्याच्या तयारीत आलेत. मात्र, तसे करण्याआधी तज्ञांनी इस्रायलला इशारा दिला आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे एक धोकादायक ऑपरेशन (मोहीम) असू शकते. इस्रायलने जर लेबनॉनमध्ये घुसून हल्ला केला तर ते धोकादायक ठरेल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. दहशतवादी संघटना हिजबुल्लाह शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास तयार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशा परीस्थितीत इस्त्रायली लष्करासाठी हे ऑपरेशन धोक्याचे असू शकते. असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाहचा समर्थक असलेला इराण देखील इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या महितीनुसार, इस्रायली सैन्य 2006 नंतर प्रथमच दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश करणार आहे. अशास्थितीत आता संघर्ष आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या शुक्रवारी हिजबुल्लाह प्रमुखाच्या हत्येनंतरही इस्रायलने हिजबुल्लाचा गड मानल्या जाणाऱ्या दक्षिण बेरूतवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. जमिनीवर उतरण्यापूर्वी हिजबुल्लाहला पूर्णपणे कमकुवत करायचा इस्रायलचा प्लॅन असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, हवाई हल्ल्यांमुळे कमकुवत होऊनही हिजबुल्लाह अजूनही धोकादायक असल्याचे मानले जात आहे. कारण त्यासाठी ही संघटना अनेक दशकांपासून तयारी करत आहे. अशास्थितीत जर इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये प्रवेश करू पाहत आहे तर त्यांच्यासाठी ते धोकादायक असल्याचे मानले जात आहे.
हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या
दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील आतापर्यंत एकूण 1,640 लोक मारले गेले आहेत. तर हिजबुल्लाह दहशतवाद्यांबद्दल बोलताना इस्रायलचा दावा आहे की, त्यांच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह आणि दोन मुख्य सहकारी यांच्यासह किमान 20 हिजबुल्ला दहशतवादी मारले गेले आहेत.