तिरुपती (Tirupati ) मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून वाद विवाद सुरूच आहेत. प्रसादाच्या लाडूसाठी वापरलेल्या तुपात माशांचे तेल आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यावरच आता अनेक ठिकाणी यावरून वाद देखील पेटला आहे. दरम्यान आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने आज मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तसेच या प्रकरणावरून न्यायालयाने त्यांना खडेबोल सुनावलेले आहेत.
तिरुपती (Tirupati ) मंदिरात लाडू बनवताना भेसळयुक्त तूप वापरण्यात आले याविषयी कोणतीच खात्री नसताना खात्री नसताना माध्यमांसमोर जायची गरज काय होती ? असा सवाल न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला विचारलेला आहे. तसेच देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा असे खडेबोल देखील न्यायालयाने सुनावलेले आहेत. लाडू बनवण्यासाठी हेच तूप वापरले जात होते याचा पुरावा कुठे आहे? तुम्ही धार्मिक भावनांचा आदर करणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून अनेक वक्तव्य केली होती यावरून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना केली असून एसआयटी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर निवेदन देण्याची काय गरज होती? तपासाच्या निकालापूर्वीच तुम्ही या प्रकरणावर भाष्य कसे केले? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.
याचसोबत भक्तांच्या भावना दुखावतील असे विधान करावे का? एसआयटीचे आदेश असताना प्रेसमध्ये जाऊन जाहीर वक्तव्य करण्याची काय गरज होती? तपास प्रलंबित असताना जबाबदार सार्वजनिक अधिकारी असे वक्तव्य करत आहेत तर याचा एसआयटीवर काय परिणाम होईल? तसेच आता एसआयटीकडून तपास करायचा की अन्य कोणाकडून या प्रकरणाचा तपास करायचा याचे उत्तर केंद्राने द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, आता न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.