ऑक्टोबर(October )महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून या महिन्यात अनेक सण आहेत. या महिन्यातील सर्व सण तोंडावर आले असताना गॅसच्या (Gas )किंमती वाढवण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबर पासून सिलेंडरचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये देखील गॅसचे दर वाढविण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ८,९ रुपयांनी तरसप्टेंबर मध्ये ३९ रुपयांनी गॅस सिलेंडर वाढले होते. आता ऑक्टोबरमध्ये ४८.५० रुपये प्रती सिलेंडर दर वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईमध्ये गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत र 1644 रुपये होती. परंतु त्यात ४८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात एलपीजी सिलिंडरची किंमत आता १६९२ रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1855 रुपये होती तर आता त्यात 48 रुपयांनी वाढ करण्यात आली असून चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरचा दर 1903 रुपये केला गेला आहे. कोलकातामध्ये गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1802.50 रुपये होती तर आता त्यात वाढ होऊन एलपीजी सिलेंडरची किंमत 1850.50 रुपये झाली आहे.
दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात एलपीजी सिलिंडरची किंमत 1691. 50 रुपये होती तर आता ऑक्टोबरमध्ये सिलेंडर 1740 रुपये झाला आहे. दरम्यान, गॅस सिलेंडरमध्ये झालेली ही वाढ 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याच प्रकारची वाढ झालेली नाही असे सांगितले गेले आहे.