Nitesh Rane : काल नुकतच महाराष्ट्र सरकारने देशी वंशाच्या गाईला राज्यमाता म्हणून दर्जा दिला आहे. त्यामूळे मोठ्या संख्येने लोकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार नितेश (Nitesh Narayan Rane) राणे यांनी खास आपल्या स्टाईलने व्यक्त होतं प्रतिक्रिया दिली आहे. नितेश यांनी आपल्या एक्स खात्यावर ट्विट करतं म्हटले आहे की “आता अवैध कत्तलखाणे बंद,हे हिंदुत्ववादी सरकारं आहे”
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ). तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे’, अशी चिंता व्यक्त करत सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी वंशाच्या गाईला राज्यमाता म्हणून दर्जा देण्यात आला.
गोमाता .. आता राज्यमाता!
म्हणुन आम्ही अभिमानाने सांगतो ..
हे हिंदुत्वादी सरकार आहे !
आता कत्तलखाने..
बंद म्हणजे बंद !
— Nitesh Rane (@NiteshNRane) September 30, 2024
‘देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या खूप महत्व आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने दुधाला पूर्णअन्न देखील म्हंटले जाते. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे.
त्यामुळे देशी गायींचं पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं कालच्या बैठकीत म्हंटल आहे.
दरम्यान, राज्यात वाढलेल्या भाकड गायींच तुम्ही काय कराल? असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुकयाचे ठरणार आहे.