आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना सर्व पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ठाणे शहरात (Thane ) ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे हा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. यामुळे ठाणे प्रशासनाने या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे.
या कार्यक्रमाला ४० हजार लोक उपस्थित राहतील असे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेणारी बैठक ठाणे महापालिका मुख्यालय येथे पार पडली आहे. या बैठकीत १२०० वाहनांचे पार्किंग, हेलिपॅड व सभास्थळाचा आढावा घेण्यात आला आहे. सभास्थळाची सोमवारी ठाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. तसेच पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झालेली असून या बैठकीत अनेकजण उपस्थित होते.
या आढावा बैठकीला ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, अपर जिल्हाधिकारी मनिषा निवासी जायभाये-धुळे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची देखील उपस्थिती होती.
याचसोबत उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, एमएमआरडीए, महामेट्रो व विविध महत्त्वाच्या विभागांचेचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत पावसाचे वातावरण लक्षात घेऊन सभामंडप आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात याव्यात तसेच त्या बाबतचे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे .