Iran Israel News : इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आता इराणने उडी घेतली आहे. इराणने काल इस्रायलवर 100 मिसाईल सोडल्या आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने त्यांच्या देशावर 100 हून अधिक मिसाईल डागली आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवले जात असून, नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इराणने केलेल्या या हल्ल्यात 6 इस्रायली नागरिक ठार झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहेत. तसेच इस्रायलची राजधानी तेल अवी-वमध्ये 13 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना
इस्रायल डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी सांगितले की, ‘इराणकडून मोठ्या प्रमाणावर इस्रायलवर मिसाईल डागण्यात आल्या आहेत. या मिसाईल राजधानी तेल अवी-वम पर्यंत पोहोचल्या आहेत.’ इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्ण हाय अलर्टवर आहे. यासह लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेण्याचे आणि बचावासाठी सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
📢*IMPORTANT ADVISORY FOR INDIAN NATIONALS IN ISRAEL*
Link : https://t.co/OEsz3oUtBJ pic.twitter.com/llt83IwIZ0
— India in Israel (@indemtel) October 1, 2024
इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचना
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचना जारी केल्या आहे. यामध्ये इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास आणि भारतीय दूतावासाच्या (परदेशात आपल्या भारतीय सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी.) संपर्कात राहण्यास सांगितले आहे.
इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रथमच निवेदन जारी केले आहे. बदलापोटी हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले आहे. इराणने हमास प्रमुख इस्माईल हनिया आणि हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह यांच्या हत्येला हे प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. आयजीआरसी, इराणच्या सैन्याच्या एलिट युनिटने म्हटले आहे की, ‘हा हुतात्म्यांना बदला आहे.’
इराणच्या लष्कराच्या युनिट IGRC ने सांगितले की, ‘हा पहिला हल्ला आहे. आम्ही इस्रायलच्या सर्व प्रमुख लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. आमचे ड्रोन युनिटही इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सज्ज आहे. इराणचा हा पहिला हल्ला आहे पण शेवटचा नाही. इराण पूर्ण ताकदीने इस्रायलला प्रत्युत्तर देईल.’
हवाई मार्ग बंद
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने आपली हवाई मार्ग बंद केली आहेत. तसेच तेथे येणारी आणि जाणारी विमाने अन्य ठिकाणी वळवण्यात येत आहेत. सध्याचे वातावरण पाहता जॉर्डननेही इस्रायलमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या आपल्या लष्करी ताफ्याला इराणच्या मिसाईल्स पाडण्याचे आदेश दिले आहेत.