पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छता मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील(Delhi )विज्ञान भवनात आज स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत. दरम्यान आज महात्मा गांधी यांची 155 वी जयंती देखील देशभरात साजरी होत आहे.
महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणालेले आहेत की, आज महात्मा गांधीजी यांची जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्या तरुण बांधवांसह मी स्वच्छता अभियानाचा एक भाग झालो आहे.तसेच मी सर्वांना विनंती करतो की तुमच्या सभोवतालच्या स्वच्छता मोहिमेत आज तुम्ही सहभागी व्हा. यामुळे स्वच्छ भारत या उपक्रमाला आणखीन योगदान लाभेल असे पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणालेले आहेत की, स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत लाखो शौचालय बांधली गेली. यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन लोकांची स्वच्छतेच्या बाबतीतली मानसिकता बदलणे तसेच स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय मंत्री एचडी कुमार स्वामी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केले आहे. महात्मा गांधींच्या 155 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शांची आठवण आम्हाला होत आहे असे देखील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे. स्वच्छ भारत दिनानिमित्त आज स्वच्छ भारत मिशनची दहा वर्ष पूर्ण होत असून पंतप्रधानांच्या या उपक्रमामुळे गांधीजींचे स्वच्छ आणि स्वच्छतेचे स्वप्न साकार केले गेले आहे. या उपक्रमाने लाखो लोकांना एकत्र आणले आहे असे एचडी कुमार स्वामी म्हणालेले आहेत.
दरम्यान, सेवा पखवाडा या मोहिमेत आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे खासदार बनसुराय स्वराज हे देखील सहभागी झाले आहेत.