Israel Iran War : इस्रायल आणि इराणमधले वातावरण आता तापले आहे. इराणने एकाच वेळी 200 क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणने क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली असल्याचे नेतन्याहू यांनी म्हंटले आहे.
जेरुसलेममध्ये सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेतन्याहू म्हणाले की, ‘इराणने केलेल्या या हल्ल्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. संध्याकाळी इस्रायलवरील हल्ला अयशस्वी झाला. जगातील सर्वात प्रगत असलेल्या इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणचा हल्ला हाणून पाडला. पुढे नेतन्याहू यांनी हवाई संरक्षण यंत्रणेचे कौतुक करत त्यांचे आभार देखील मानले आहेत.
दरम्यान, इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. इस्रायलने कारवाई केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास आम्ही विध्वंसक पद्धतीने प्रत्युत्तर देऊ, असे इराणने संयुक्त राष्ट्रात म्हटले आहे.
איראן עשתה הערב טעות גדולה – והיא תשלם על כך. pic.twitter.com/B2yppgGqcE
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 1, 2024
हल्ल्याची माहिती आधीच देण्यात आली
इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हल्ल्याच्या काही वेळापूर्वी आम्ही राजनयिक माध्यमांद्वारे वॉशिंग्टनला सतर्क केले होते. इराणच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले होते की, ‘आम्ही रशियाला इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत आधीच माहिती दिली होती. इस्रायलने कारवाई केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि विध्वंसक पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असेही इराणने म्हटले आहे.
इराणच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने देशातील नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हिजबुल्लाहवरील कारवाई सुरूच राहील असेल देखील इस्रायलकडून सांगण्यात येत आहे.