मंगळवारी इराणने इस्त्राईलवर 200 क्षेपणास्त्रे टाकून हल्ला केला होता. या हल्ल्याचा तीव्र निषेध अनेक देशाच्या नेत्यांनी केला आहे. यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Kir Starmar), यूकेचे संरक्षण सचिव जॉन हेली आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज त्यांनी देखील या हल्ल्याचा जोरदार निषेध केलेला आहे.
यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबाबत पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, इराणच्या इस्त्राईलवरील हल्ल्याचा मी पूर्णपणे निषेध करत आहे. इस्त्राईल देश निर्दोष असून इराण देशाकडून त्यांना इजा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परंतु आता आम्ही सर्व इस्राईलच्या पाठीशी उभे आहोत. इराणने हे हल्ले थांबवले पाहिजेत. मी आज पंतप्रधान नेतन्याहू, जॉर्डनचे राजा, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि चांसलर शुल्ट्झ यांच्याशी बोललो आहे. गेल्या आठवड्यात , मी लेबनॉन आणि गाझामधील संघर्ष मिटावा यासाठी
लेबनॉनचे पंतप्रधान मॅककार्थी, अध्यक्ष अब्बास, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे नेते यांच्यासह इतर नेत्यांशी देखील बोललो आहे असे कीर स्टार्मर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता इस्त्राईल परिसरातील सर्व यूके नागरिकांना शक्य तितक्या लवकर निघून जाण्याचा इशारा कीर स्टार्मर यांनी दिलेला आहे.