Gandhi Jayanti : आज (2 ऑक्टोबर) संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (Gandhi Jayanti) साजरी करत आहे. यानिमित्ताने सर्वजण महात्मा गांधींच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत आहेत. तसेच, संपूर्ण देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो आहे. महात्मा गांधी जयंतीनिमीत्त आज ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच राजकीय नेत्यांनी देखील महात्मा गांधी जयंती निमित्ताने कायक्रम आयोजित केले आहेत. आज सकाळीच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. मुंबईतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीची शांतता रॅली निघाली. दरम्यान, गांधी जयंती निमित्त शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण काँगेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींच्या सूचनेचे पालन केले नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
VIDEO | "If they (Congress) respect (Mahatma) Gandhi Ji, then they should abide by what he said. Gandhi Ji had said that we have Independence, now Congress should be dissolved," says Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis).
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/kFYcXTGwaA
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2024
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महात्मा गांधींच्या जयंती निमित्त शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले, ‘काँग्रेसला महात्मा गांधींबाबत आदर नाही. महात्मा गांधींना काँग्रेस मानत असतं तर महात्मा गांधींच्या सूचनांचे पालन त्यांनी केले असते. महात्मा गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं होते की स्वातंत्र्य मिळालं आहे, काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे. आता काँग्रेसचे विसर्जन करावे. जर असे केले नाही तर काँग्रेस पक्ष हा देशाच्या प्रगतीत अडथळा ठरेल. महात्मा गांधी यांच्या या सूचनेचं पालन जर काँग्रेसने केले तरच त्यांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार आहे. असं देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.