काही दिवसांपूर्वी राज्यात जोरदार पाऊस पडत होता. तसेच देशभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस विविध भागात पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून आता पूरग्रस्त राज्यांना गृहमंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. आज महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये या निधीच्या माध्यमातून मिळालेले आहेत. सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वात जास्त निधी मिळालेला आहे. यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आभार मानले आहेत.
आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की, केंद्र सरकारकडे महाराष्ट्राने काही मागितले की लगेचच मिळते याचा पुन्हा एकदा प्रत्येय आम्हाला आला आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून पुर आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या राज्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी कायम आहोत याची जाणीव करून देतात असे देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655.60 कोटी, गुजरातला 600 कोटी, हिमाचल प्रदेशला189.20 कोटी, केरळला 145.60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
तसेच मणिपूरला 50 कोटी, मिझोरामला 21.60 कोटी, नागालँडला 19.20 कोटी,सिक्कीमला 23.60 कोटी, तेलंगणाला 416.80 कोटी, त्रिपुराला 25 कोटी आणि पश्चिम बंगालला 468 कोटींची मदत दिली गेली आहे.