आगामी विधानसभा निवडणूकीची ( Vidhansabha Elections 2024) सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हरियाणामध्ये (Haryana) आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यानंतर कोणत्याच पक्षाला प्रचार करता येणार नाही. हरियाणात 5 ऑक्टोबर रोजी आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. हरियाणामध्ये अनेक पक्षांचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. अस असतानाच आता क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हरियाणात प्रचारासाठी पोहचला आहे. हरियाणातील तोशाम याठिकाणी त्याने कॉँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी (Anirudh Chaudhry) यांच्यासाठी मतदान करावे अशी मागणी केलेली आहे.
प्रसारमाध्यमांशी वीरेंद्र सेहवाग यांनी संवाद साधला आहे. “तो आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आला आहे. यामुळेच जेव्हा मोठा भाऊ काहीतरी काम करत असतो तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्याला मदत करणे गरजेचे असते’ असे भाष्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. तसेच जनतेला दिलेली सर्व आश्वासने तो पूर्ण करेन. माझा भाऊ निवडून आला तर तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे विधान देखील वीरेंद्र सेहवाग यांनी यावेळी केले आहे.
यावरूनच आता अनिरुद्ध चौधरी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिरुद्ध चौधरी म्हणाले आहेत की , “प्रामुख्याने क्रिकेटपटू निवडणूक प्रचारासाठी जात नाहीत, पण वीरेंद्र सेहवाग नेहमीच माझ्यासाठी येतो, यामुळेच इथे आल्याबद्दल मी वीरूचा आभारी आहे.”
दरम्यान, हरियाणातील तोशाम जागेवर माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रुती चौधरी आणि नातू अनिरुद्ध चौधरी एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. त्यामुळे आता या बहीण भावांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी तोशाम जागेवर श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. तर कॉँग्रेसकडून अनिरुद्ध चौधरी तोशामची जागा लढवणार आहेत. यामुळेच विधानसभा निवडणुकीत नक्की कोणाचा विजय होणार ? हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.