काँग्रेसने देशाचा घात करत अनेकदा संविधानाच्या मुळालाच धक्का दिला असा घणाघात ॲड. संदीप जाधव यांनी नुकताच पुण्यात केला. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने राज्यभर सामाजिक संवाद मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. कसबा भागात मध्ये वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायाच्या विषयासंदर्भात चर्चा – संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी मंचावर विवेक विचार मंचाचे शहर संयोजक विजय दरेकर, प्रमुख वक्ते महेश पोहनेकर, व ॲड जाधव यांची उपस्थिती होती. महेश पोहनेरकर यांनी अनुसूचित जातीच्या असणाऱ्या अनेक समस्या जाणून घेतल्या यामध्ये त्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाचा पाठपुरावा घेतला एक चर्चात्मक सत्राच्या मध्या माध्यमातून सर्वांना आपले मत मांडता आले.
विविधतेने नटलेल्या भारतीयांच्या एकतेचे सूत्र संविधान असून कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने जाणीवपूर्वक केलेला अपप्रचार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, “अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जनसामान्यांमध्ये संविधानाचा प्रचार होणे गरजेचे आहे. कट्टरतावादी धर्मांध इस्लामिक संघटना, नक्षलवादी संघटना व फुटीरतावादी शक्तींच्याकडून संविधानाला खरा धोका आहे.”
पथनाट्य करीत मूल्य जागर
सामाजिक संवाद मेळावाची सुरुवात संविधान प्रास्ताविक वाचनाने झाली. तसेच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने पथनाट्य सादरीकरण करत संविधान मूल्य रुजविण्याचा संदेश दिला.
संविधान सरनामा वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले.