जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे एका हिंदू मंदिरावर अनधिकृत बांधकाम करून त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी स्थानिक हिंदूंच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. त्यामुळे घटनेतील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, शेंदुर्णी येथील छ्त्रपती शिवाजी नगर भागातील संत गहिनीनाथ यांची मागील जवळपास शंभर वर्षापासून समाधी आहे. समाधी स्थळाच्या समोर घरे, दुकान व हॉटेलचे बांधकाम झाल्यामुळे समाधी मंदिर दुर्लक्षित झाले होते. मागील तीन चार दिवसात तिथे काही मुस्लिम तरुणांनी येऊन समाधीवर हिरवी चादर चढवली. नमाज पडण्यासही सुरुवात केली. सोमवार रोजी त्यांनी भिंत बांधण्यास सुरुवात केली असताना काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी विचारपूस केली असता इथे काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात आल्यामुळे स्थानिक हिंदूंनी त्यांना विरोध केला.
घटनेची माहिती मिळताच स्थानीय हिंदू महिला व काही तरुण तिथे गोळा झाले. महिला व तरुणांनी मुस्लिम मुलांना जाब विचारला. तुम्ही इथे काय करताय? कोणी बांधकाम करण्यास सांगितले? यावर त्यांनी काही उत्तर न देता पळ काढला. त्यापैकी एक मुलगा दुसर्या दिवशी पुन्हा आला व त्याने सांगितले की इथला पिर माझ्या स्वप्नात आला होता व त्याने मला हे करण्यास सांगितले.
त्यामुळे अश्या काहीही कपोलकल्पित गोष्टी व स्वप्नाच्या आधारावर दुसर्या धर्माच्या श्रद्धा स्थानावर जाऊन तिथे कुठल्याही परवानगी शिवाय अनधिकृत बांधकाम करणे, हिंदू संतांच्या समाधीवर हिरवी चादर चढवणे योग्य आहे का? असा प्रश्न स्थानिक उपस्थितीत करत आहे. हिंदू नागरिकांनी येथील अतिक्रमण काढून तिथे पुन्हा भगवे झेंडे लावून दिवा बत्ती केली आहे. स्थानिक नागरिक सतीश नागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.