Eknath Shinde-Devendra Fadnavis : काल (गुरुवारी) नवरात्रीच्या ( Navratri 2024) पहिल्या दिवशीच ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला गेला. याबाबतची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केली. मराठी सकट पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांना देखील ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यभरातून प्रतिकिया येत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकारचे देखील आभार मानले आहेत. तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये आपल्या भावना व्यक्त करत लिहिले, ‘अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार! अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य… https://t.co/vgdMhZtbsg— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2024
पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत करत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे.
ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस.
अत्यंत अभिमानाचा क्षण !लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…#मायमराठी #अभिजातमराठी pic.twitter.com/8seexSeliI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.