Kolkata Rape Murder Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये (R G Kar Medical College and Hospital) ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून उफाळलेला वाद अजूनही थांबलेला नाहीये. याप्रकरणी डॉक्टर अजूनही संपावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कामावर परतण्याचे आदेश दिलेले असताना देखील डॉक्टरांनी संप (Kolkata doctors strike) मागे घेतला नाही. आता या प्रकरणी आणखी एक वाद निर्माण झाला आहे.
संपावर असलेल्या डॉक्टर विद्यार्थ्यांनी आता पीडित ट्रेनी डॉक्टरचा पुतळा महाविद्यालयाच्या परिसरात बसवला आहे. या पुतळ्याला ‘क्राय ऑफ द आवर्स’ असे नाव देण्यात आले आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्या घटनेच्या वेळी पीडितेचे अवस्था काय असावी हे दाखवण्यात आले आहे. महाविद्यालय परिसरात बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत आहेत.
या पुतळ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अशा पद्धतीचा पुतळा बसल्याने गोंधळ सुरु आहे. तसेच याला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होत आहे. नेटकरी याला अपमानास्पद म्हणत आहेत. तसेच हा पुतळा लवकरात लवकर हटवावा यासाठी मागणी देखील करत आहे. तर अनेकांनी अशा प्रकारे बलात्कार पीडितेचा पुतळा बसवू नये. असे म्हंटले आहे.
#justiceforAbhya
"Cry of the Hour""The Agony, the Pain, the Suffering…
A poignant depiction of the unbearable trauma Abhaya enduredToday A #statue erected in memory of the rape and murder victim at R.G. Kar Medical College and Hospital"#MedTwitter #medX #rgkarprotest pic.twitter.com/Pek84iAsNj
— Indian Doctor🇮🇳 (@Indian__doctor) October 2, 2024
एकीकडे सोशल मीडियावर पुतळा हटवण्याची मागणी होत असताना दसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते कुनन घोष यांनीही या वादात उडी घेतली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच अशा प्रकारे पीडितेचे नाव आणि ओळख उघड करू नये. असे देखील सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘कोणताही जबाबदार माणूस हे करू शकत नाही. न्यायासाठी आंदोलने होत आहेत. पण, ही मूर्ती योग्य नाही. अशा प्रकारचा पुतळा बसवणे चुकीचे आहे. असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
तर दुसरीकडे आम्ही कोणताही नियम मोडला नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे. ही प्रतिकात्मक मूर्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही एका मुलीच्या दु:खाबद्दल बोलत नाही आहोत. आम्हाला त्या रात्री काय घडले याची आठवण सरकार आणि प्रशासनाला करून देत राहायचे आहे. असे विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.