Israel Iran War : इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई (Ali Khamenei) यांनी आज (शुक्रवारी) इराणच्या लोकांना संबोधित केले आणि मुस्लिमाना एकत्र येण्याचे आवाहन केले.
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहसाठी आज तेहरानच्या ग्रँड मशिदीत नमाज अदा करण्यात आली. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई सहभागी देखील झाले होते. नमाज अदा केल्यानंतर खामेनेई यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि इस्रायलवर पुन्हा हल्ला करणार असल्याची घोषणा केली.
यावेळी ते म्हणाले, शत्रूंना आम्हाला तोडायचे आहे. शत्रू मुस्लिम देशांच्या मागे आहेत, पण आपण खचून जात होता कामा नये. जगभरातील मुस्लिम बांधवानो एकत्र या. एकत्र शत्रूंविरुद्ध लढूया असे ते यावेळी म्हणाले आहेत.
खामेनेई यांनी धर्माचे कार्ड खेळत जगातील सर्व मुस्लिमांना एकजूट होण्याचे आवाहन केले. मुस्लिम एकत्र राहिले, तर अल्लाह मेहरबान राहील असं देखील ते यावेळी म्हणाले. ‘अल्लाहने जो मार्ग दाखवलाय, त्यावर मुस्लिमांनी चालले पाहिजे कुराणात म्हटलय की, मुस्लिमांनी एकत्र राहीले पाहिजे. मुस्लिम विरोधक विनाशाच राजकारण करत आहेत. मुस्लिमांना आपल्या शत्रुंपासून सावध राहिलं पाहिजे” असे खामेनेई यांनी म्हंटले आहे.
तसेच यावेळी त्यांनी अरब मुस्लिमांना देखील पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आम्ही लेबनॉनसाठी सर्वकाही करू. गरज भासल्यास आम्ही पुन्हा इस्रायलवर हल्ला करू. असेही खामेनेई म्हणाले आहेत.