विधानसभा निवडणूका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना राज्य सरकारकडून विविध योजनांची घोषणा केली जात आहे. आता राज्य सरकारकडून मुलींसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Fule scholarship scheme) अंतर्गत राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तब्बल तिप्पटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्यार्थीनींच्या शिक्षणाप्रति हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील मुलींना एकप्रकारे दिलासाच मिळालेला आहे.
राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य विभागामार्फत ही शिष्यवृत्ती मुलींना दिली जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा करण्यात आलेली आहे. इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते. विमाप्र, विभाभज आयन इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना देखील ही शिष्यवृत्ती मिळते. या मुलींना प्रतिमहिना 100 रुपये दिले जायचे आता ही रक्कम वाढवून 300 रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनींना प्रश्न पडला असेल की? या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी ? तर मुलींनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधून देखील या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येईल.