विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर १० वर्षांनी निवडणूक घेण्यात येत आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहेत. आज हरियाणात दोन कोटींपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हरियाणात एकाच टप्प्यात आज (५ ऑक्टोबरला) मतदान होत आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. हरियाणा निवडणुकीसाठी प्रचाराची तोफ 3 ऑक्टोबर रोजी संपलेली आहे.आज 11 वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी हरियाणामध्ये 22.7 टक्के मतदान झाले होते. तर आज दुपारी 1 वाजेपर्यंत 36.69 टक्के मतदान हरियाणामध्ये झालेले आहे.
यामध्ये सर्वाधिक 42.64% मतदान नूह जिल्ह्यातून झाले आहे तर सर्वात कमी पंचकुला जिल्ह्यात झालेले आहे.पंचकुला जिल्ह्यात केवळ 25.89% मतदान झाले आहे. आज हरियाणात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हरियाणात या विधानसभा निवडणुकीत एकूण 1031 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 101 महिला असल्याचे सांगितले गेले आहे.
भाजपने 90 पैकी 89 जागांवर,काँग्रेसनेही ८९ जागांवर,जेजेपी-आझाद समाज पार्टी युती 78 जागांवर, सीपीएम एका जागेवर,जेजेपीने 66 जागांवर , एएसपीने 12 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे केलेले आहेत. आम आदमी पक्ष 88 जागांवर, बसपा 35 , तर ILND 51 जागांवर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 20,629 मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणारे 10,775,957 पुरुष तर 9,577,926 महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या 467 आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.