राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर अनेक योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. महिलांना या योजनेमार्फत दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक मदत मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजना चालू करण्यात आली होती. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पीएम किसान योजनेची माहिती दिलेली आहे. याच दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी करण्यात आला आहे. भारत सरकारकडून 2019 मध्ये देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती.
सरकारकडून देशातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे 20 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केलेली आहे. या योजनेमार्फत सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेमार्फत जमा केले जातात. परंतु आता ज्या शेतकऱ्यांना याचा 18 व ह्फता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in वर मेल करून तुम्ही या योजनेची माहिती देखील मिळवू शकता तसेच हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 किंवा 155261 वर कॉल करून प्रतिनिधींशी थेट संवाद साधू शकता.