Women’s T20 World Cup : आज भारतीय महिला संघ आयसीसी महिला टी-20 (Women’s T20 World Cup) विश्वचषकातील दुसरा सामना पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. आजच्या या हायव्होल्टेज सामन्यावर देशातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागून आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते. आजच्याही सामन्यासाठी अशीच क्रेज पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानचा पहिला सामना श्रीलंकेसोबत होता, ज्यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा ३१ धावांनी पराभव करून गुणांची आघाडी घेतली होती. दुसरीकडे, भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होता, जिथे भारताला न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशातच पहिल्या पराभवानंतर भारतासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील दुसरा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
येथे बघता यईल लाईव्ह सामना?
भारत आणि पाकिस्तान महिला संघांमधील ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर पाहता येईल.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे बघता येईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा आजचा सामना तुम्ही हॉटस्टार वर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकता.
महिला टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शैफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, दयालन हेमलता, आशा सोभना, राधा यादव,अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, श्रेयंका पाटिल, सजना सजीवन.
पाकिस्तान संघ : फातिमा सना (कप्तान), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा डार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब, सादिया इकबाल, तुबा हसन.