Israel–Hamas war : इस्रायल-गाझा युद्धाला (Israel–Hamas war) उद्या ७ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात 1200 इस्रायली मारले गेले होते. यानंतर इस्रायलनेही बदला घेण्याचे ठरवले आणि आजही दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. इस्रायलने गाझावर जवळपास दररोज हल्ले केले असून आतापर्यंत 41,788 लोक मारले गेले आहेत. यामध्ये केवळ हमासच्या लोकांचाच समावेश नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.
एक वर्ष पूर्ण झाल्यावर इस्रायलने गाझावर पुन्हा बॉम्ब टाकले ज्यात १८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
आतापर्यंत 41,788 लोकांनी गमावला जीव
या युद्धात आतापर्यंत 41,788 लोक मारले गेले आहेत तरीही हे युद्ध थांबले नाहीत. हमास जवळपास नष्ट झाल्याचे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू सांगत आहेत. आजही इस्रायलला आपल्या ओलिसांना हमासच्या ताब्यातून सोडवता आलेले नाही. हे ते ओलिस आहेत ज्यांचे गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने अपहरण केले होते.
वृत्तानुसार, गाझामध्ये 100 इस्रायली ओलीस ठेवण्यात आले आहेत. यापैकी केवळ 70 जण जिवंत असल्याचे बोलले जात आहे. अद्याप इस्रायलला कुठेही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. याशिवाय, ते हिजबुल्लाह आणि इराण यांच्याशी वेगळ्या युद्धातही अडकले आहे. हमास, हिजबुल्लाह, आणि इराण सोबत सुरू असलेल्या युद्धात 60,000 हून अधिक इस्रायली लोक बेघर झाले आहेत.
एकीकडे इस्रायलचे हमाससोबतचे युद्ध संपलेले नाही तर दुसरीकडे त्यांच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनशी युद्ध सुरू केले आहे. हे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तर दुसरीकडे इराणने इस्रायलवर हल्ले केले आहेत. त्याचा बदला इस्रायलला अजून घ्यायचा आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल काय करते हे संपूर्ण जग श्वास रोखून पाहत आहे.
2 ऑक्टोबर 2024 च्या रात्री इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा भडीमार केला होता. या हल्ल्यात “लष्करी आणि सुरक्षा आस्थापनांना” प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. मात्र, या क्षेपणास्त्रांपासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यात इस्रायलला यश आले आणि यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लवकरच बदला घेण्याचा इशारा दिला आहे.