Chennai Air Force Show : भारतीय हवाई (Chennai Air Force Show) दलाच्या (IAF) 92 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी चेन्नईमध्ये एअर-शोचे आयोजन करण्यात आले होते. आयएएफच्या विमानांनी आकाशात आपली हवाई शक्ती आणि युद्धकौशल्य दाखवून लोकांचा उत्साह भरून काढला. पण, एअर शो संपल्यानंतर येथे लोकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उष्णतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर 230 पेक्षा अधिक नागरिकांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लाखोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी!
हा एअर शो पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक बीचवर जमले होते. पण, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्था नव्हती. काही लोक जवळच्या लाइटहाउस मेट्रो स्टेशनवर तर काही चेन्नई एमआरटीएस रेल्वे स्टेशनवर शो पाहण्यासाठी जमले होते. प्लॅटफॉर्मवर अनेक लोक हा कार्यक्रम पाहत उभे होते. शो संपल्यानंतर प्रचंड लोक या गर्दीत अडकले आणि बाहेर निघण्यासाठी धडपड करू लागले, अशापरीस्थितीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि या गर्दीत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.
#WATCH | Chennai, Tamil Nadu | A woman seen being evacuated from a huge rush at the Mega Air Show on Marina Beach ahead of the 92nd Indian Air Force Day.
There are reports of attendees fainting, rushed to the hospital due to heavy crowd presence and heat. pic.twitter.com/SgNEhuTnUH
— ANI (@ANI) October 6, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच उन्हामुळे अनेकजण बेशुद्ध झाले होते. गर्दी इतकी होती की पाण्याची व्यवस्थाही कमी पडली. अनेकांना पाणीही मिळाले नाही. शो संपताच लोकं येथून बाहेर पडत होते. मात्र, मोठ्या संख्येने लोकांचा जमाव जमला आणि हा अपघात झाला.
राफेलसह 50 विमानांनी आपले युद्धकौशल्य दाखवले
या एअर शोमध्ये सुमारे 72 विमानांनी भाग घेतला होता, ज्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये केली जाईल. सुपरसॉनिक लढाऊ विमान राफेलसह सुमारे 50 लढाऊ विमानांनी आकाशात विविध रंगांची चमक पसरवली. डकोटा आणि हार्वर्ड, तेजस, SU-30 आणि सारंग यांनीही हवाई सलामी दिली. सुखोई एसयू-30 नेही आपले कौशल दाखवले.