Mumbai News : काल (रविवारी) मुंबईतील चेंबूर (Chembur) परिसरात मोठी दुर्घटना घडली. सिद्धार्थ कॉलनीत बांधलेल्या एका दुकानाला अचानक आग (Mumbai Chembur Fire) लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत नऊ सदस्यांचे कुटुंब राहत होते.
या आगीची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सिद्धार्थ कॉलनीत बांधलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानाला ही आग लागली आणि आग पसरतच राहिली, या इमारतीच्या तळमजल्यावर दुकान असून वर कुटुंब राहत होते.
या भीषण आगीत तळमजल्यावर असलेल्या दुकानातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदींसह व वरील घरातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदी साहित्य जळून खाक झाले आहे.
ही एक दुमजली इमारत होती, ज्यात खाली दुकान चालू होते आणि वर एक कुटुंब राहत होते. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेने गुप्ता परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिवारातील सदस्यांची भेट घेतली आणि मदत जाहीर केली केली आहे.
या झालेल्या घटनेची चौकशी लवकरात लवकर केली जाईल आणि योग्य तो निर्णय देखील घेण्यात येईल. सरकार या पीडित कुटुंबासोबत असून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मयताला पाच लाख रुपये, अशी एकूण 35 लाखांची मदत शासनाच्या वतीने दिली जाईल. तसेच जे जखमी आहे त्यांचा शासनाच्या वतीने योग्य तो वैद्यकीय उपचार केला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल, आग का लागली, कशी लागली या संदर्भात बैठक घेऊन चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला महिन्याला लागणारी मदतीची आवश्यकता भासल्यास तीही सरकार करेल.