इस्रायल(Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या गंभीर संघर्षामुळे लेबनॉनच्या (Lebanon) सीमेवर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणात रॉकेट, मिसाइल्स आणि बॉम्बचा वापर केला जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर(Lebanon) एका पाठोपाठ एक हल्ले केले जात आहेत. काल (रविवारी ) इस्रायली सैन्याने गाझावर (Gajha) परत हल्ला केला आहे. गाझातील एका मशिदीवर आणि शाळेवर हल्ला केला असून या हल्ल्यात 26 जण ठार झाले आहेत तर 93 जण जखमी झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात युद्ध सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासने हल्ला केला होता त्यामध्ये 1 हजार 200 लोक मारले गेले होते. त्यानंतर इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यात सुमारे 42 हजार पॅलेस्टिनी मारले गेले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.
लष्करी उद्देशांसाठी शाळा, रुग्णालये आणि मशिदी यासारख्या नागरी सुविधांचा वापर केल्या असल्याचा आरोप हमासवर इस्रायलने केला होता. परंतु हमासने हा आरोप नाकारलेला आहे. इथे असलेल्या “हमासच्या दहशतवाद्यांवर अचूक हल्ले” केले आहेत असे इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आले आहे. हमास संचालित गाझा सरकारी मीडिया कार्यालयाने सांगितले आहे की, विस्थापित पॅलेस्टिनींनी या शाळेत आणि मशिदीत निवारा घेतला होता.
दरम्यान, बेरूतच्या दक्षिणिकडील उपनगरांवर इस्रायलने अनेक हल्ले केलेले आहेत. या हल्ल्यात बेरूतच्या दक्षिणिकडील उपनगरे भाजून निघालेली आहेत. तसेच याचसोबत इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हौला,बिल्डा यासह 25 गावांतील रहिवाशांना शहर आणि गावे सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत.