Sanjeev Arora ED Raid : अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांच्या घरी छापा टाकला आहे. ईडीकडून अरोरा यांच्या गुरुग्राम येथील घरी तसेच त्यांच्या इतर ठिकानावर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीकडून (ED) हा छापा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात टाकण्यात आला आहे. जमीन फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव अरोरा यांच्यावर फसवणुकीने जमीन त्यांच्या कंपनीच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. संजीव अरोरा यांचा सहकारी हेमंत सुद याच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. हेमंत सुद हा मोठा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे.
कोण आहेत संजीव अरोरा?
61 वर्षीय संजीव अरोरा 1986 पासून व्यवसायात आहेत. रितेश इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने त्यांनी यशस्वी निर्यात गृह चालवले आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे निर्यात कार्यालय उघडून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी लुधियानामध्ये एक अत्याधुनिक औद्योगिक उद्यानही विकसित केले आहे.
#WATCH पंजाब: प्रवर्तन निदेशालय मनी लॉन्ड्रिंग मामले में AAP सांसद संजीव अरोड़ा और अन्य के आवास पर छापेमारी कर रहा है।
(वीडियो AAP सांसद संजीव अरोड़ा के करीबी सहयोगी के आवास से है।) pic.twitter.com/JxOFTyQdZ4
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2024
मेक इन इंडिया योजनेअंतर्गत, 2019 मध्ये त्यांनी सुझुकी मोटर्स गुजरात प्लांटशी करार केला आणि फेरस मेटल व्यवसायातही प्रवेश केला. याशिवाय महिलांच्या कपड्यांचा ब्रँड फेमेला फॅशन लिमिटेडही त्यांनी लॉन्च केला होता. ते कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्ट देखील चालवतात. येथे ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात.
दरम्यान, संजीव अरोरा यांनी ईडीच्या या छाप्यावर प्रतिक्रिया देत म्हंटले आहे. “मी एक कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, ईडीला पूर्ण सहकार्य करीन आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील याची खात्री करेन,” अशी पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.