Kiren Rijiju : भाजपने केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि मुस्लिमांना खूश करण्याचा आरोप केला आहे.
आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी राहुल गांधींवर भाष्य केले आहे, व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, ‘मुसलमानांना माझा इशारा: काँग्रेसची व्होट बँक बनू नका!’ पुढे त्यांनी लिहिले, काँग्रेस पक्षाच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाला बळी पडू नका.’ त्यांनी हा इशारा हिंदूंना दिला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ त्यांच्या एका मुलाखतीचा आहे.
काँग्रेस पक्षाने मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या वेळी देखील काँग्रेस पक्ष आपली १५ टक्के मुस्लिम व्होट बँक राखीव असल्याचे सांगतो. यावरून काँग्रेसची विचारसरणी दिसून येते. काँग्रेस पक्ष मुस्लिमांकडे व्होट बँकेच्या दृष्टीकोनातून पाहतो हे जगजाहीर सत्य आहे. मुस्लिमांचेही हे मोठे नुकसान आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिम व्होट बँकेची हमी घेतली आहे. या समाजाची मते आपल्यालाच मिळतील, असे त्यांना वाटते.
ते पुढे म्हणाले की, मुस्लिमांना व्होट बँक म्हणून ठेवणे आणि हिंदूंमध्ये फूट पाडणे हा काँग्रेसच्या योजनांचा भाग आहे. त्यामुळे आजकाल राहुल गांधींच्या तोंडून एससी-एसटी, ओबीसी असे शब्द बाहेर पडत आहेत. SC, ST, OBC यांना भेडसावणाऱ्या समस्यांची ABCD देखील राहुल गांधींना माहीत नाही, पण त्यांच्या तोंडून SC, ST, OBC सतत बाहेर पडत आहे. त्यांनी मुस्लिमांची व्होट बँक बनवली आणि आता हिंदूंमध्ये एसटी, एससी, ओबीसी अशी विभागणी करून मते मिळवायची आहेत. यामुळे देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. असे किरेन रिजिजू म्हणाले आहेत.
My warning to the Muslims: Do not become vote bank of the Congress!
My warning to Hindus & others: Do not become the victims of divide & rule Policies of the Congress Party. pic.twitter.com/hOL345qdYx
— Kiren Rijiju (@KirenRijiju) October 6, 2024
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे काम सुरू केले आहे. पीएम मोदींच्या या प्रचाराला खीळ घालण्यासाठी काँग्रेसने फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले आहे. इंग्रजांनीही हिंदूंमध्ये फूट पाडली, आता काँग्रेस पक्षाला पुन्हा हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे. मला वाटते की अशा गोष्टीचा सर्वाधिक फटका देशाला बसेल. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र राहावे लागेल. आम्ही मुस्लिमांनाही सांगू इच्छितो की, तुम्ही किती दिवस काँग्रेसची व्होट बँक बनून कठपुतळ्यांसारखे नाचत राहाल. पीएम मोदींनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. सरकारी योजनांचा लाभ सर्वांनाच मिळत आहे. असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे.
काँग्रेस पक्षाला देशाचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. इंग्रजांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाखाली काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केले आणि देशाला गरीब ठेवले. मुस्लिम आणि बौद्ध समाजातील लोकांना मागास बनवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. मला समाजातील प्रत्येक घटकाला आवाहन करायचे आहे की, काँग्रेस पक्षाच्या फसवणुकीत पडू नका. काँग्रेसला मतदान करणे ही सर्वात मोठी चूक ठरेल.