Assembly Election : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा (Election Results 2024) निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून, आज सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
हरियाणातील सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेसला बहुमत दिसत होते. पण काही काळानंतर चित्र बदलेले. आता काँग्रेस आणि भाजपमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळत आहे. कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजपा पुढे दिसत आहे.
तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ आहे. येथे भाजपची पिछेहाट दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसल्याचे सुरुवातीला दिसून आले. मात्र, हरियाणात चित्र बदलत आहे. येथे भाजप आघाडीवर येत आहे.
हरियाणात भाजप गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे. अशा स्थितीत तिसऱ्यांदा देखील भाजप विजयी होईल, अशी आशा आहे. तसेच 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते. मात्र, आता जम्मू-काश्मीरमध्ये चित्र बदलत आहे. सुरुवातीपासूनच भाजप पिछाडीवर जात आहे. अशा स्थितीत भाजपला येथे फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले, तर हरियाणाच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबरला मतदान झाले. एकीकडे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची आशा करत असताना दुसरीकडे काँग्रेसही पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ही निवडणूक लढवत आहेत, तर भाजप एकटाच लढत आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले. येथे पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान झाले. तीनही टप्प्यात एकूण ६३.४५ टक्के मतदान झाले. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करून निवडणूक लढवली, तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकाकी लढत आहेत.
हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात 65 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले. यावेळी हरियाणा निवडणुकीत ६७.९ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान एलेनाबादमध्ये 80.61 टक्के आणि सर्वात कमी 48.27 टक्के बडखलमध्ये होते. तर लोकसभा निवडणुकीत ६४.८ टक्के मतदान झाले.