हरियाणा(Hariyana )विधानसभा निवडणुकीसाठीची (Vidhansabha Elections 2024) मतमोजणी आज चालू झालेली आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांची सुरुवातीला मतमोजणी केली गेली आहे. तसेच हरियाणासोबत जम्मू काश्मीरमध्ये देखील आज विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी होत आहे.
सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती परंतु आता भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये भाजपकडे 30 जागा देखील नव्हत्या परंतु आता भाजपने मुसंडी मारत 48 जागांवर आघाडी घेतलेली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात कॉँग्रेस पक्ष आघाडीवर होता. यामुळे कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी देखील सुरू केली होती.
याचसोबत एक्झिट पोलमध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात एकहाती सत्ता स्थापन करेल असे सांगितले जात होते. परंतु सध्याची मतमोजणी पाहता भाजपच हरियाणात सत्ता स्थापन करेल असे दिसून येत आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील यश भाजपसाठी अतिशय उत्साही आणि आनंददायी ठरेल असे म्हटले जात आहे. सध्या भाजप मतमोजणीमध्ये आघाडीवर असला तरी पुढील काही तासांमध्ये हे कल कायम राहणार का ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाजपला हरियाणात फटका बसेल अशा चर्चा रंगत होत्या परंतु मतमोजणीची वाढती आकडेवारी पाहता याठिकाणी भाजपचे सरकार स्थापन होईल का ? अशा चर्चा रंगत आहेत. भाजपची मतांची वाढती आकडेवारी पाहता आता काँग्रेसच्या आनंदावर विरजण पडलेले दिसत आहे.