Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज अचानक प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे आजचे सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज होणारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे.
ऐन विधानसभेची निवडणुक जाहीर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्र्यांचा आजचा सोलापूरचा दौरा महत्वाचा मानला जात होता. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे आजचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अनेक नियोजित कार्यक्रम होते. मात्र, आज होणारे त्यांचे दौरे, सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळेच त्यांचे आज होणारे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे हे रद्द करण्यात आले आहेत. असे देखील सूत्रांकडून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एकनाथ शिंदे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या प्रचार-प्रसारात सतत व्यस्त आहेत, आणि यामुळेच त्यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळीच त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा कार्यक्रम सोलापूर येथे होणार होता. मात्र, त्यांचा हा दौराच रद्द झाला आहे. तुमच्या माहितीसाठी मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे.
मंगळवारी ‘या’ कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते मुख्यमंत्री
आज सकाळी १०.३० वाजता मुंबई मंडळाच्या विविध गृहप्रकल्पातील कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा प्रारंभ होणार होता. यात ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या प्रचार व प्रसार कार्यक्रमात सामील होणार होते. त्यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेसाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती.