आज हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Elections 2024) निकाल जाहीर होत आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना भाजपने (Bharatiya Janata Party) मतमोजणीत सध्या जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपने जवळपास 49 जागा जिंकलेल्या आहेत. तर काँग्रेसने 36 जागा मिळविलेल्या आहेत. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतू सर्व अंदाज खोटे ठरवत भाजप हरियाणात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
आता 12 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या १० वर्षांपासून हरियाणामध्ये भाजपचीच सत्ता आहे. परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणात अपयश आले होते. 2019 मध्येही मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली होती. भाजपला त्या ठिकाणी कमी मत मिळाले होते परंतु जेजेपीच्या पाठिंब्याने त्याठिकाणी भाजपने सरकार स्थापन केले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या ७ महिने आधीच भाजपने मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले होते.
दरम्यान, हरियाणात भाजपला अतिशय घवघवीत यश मिळालेले आहे. यामुळे भाजप कार्यक्रत्यांकडून याचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. “आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल.” असा भाजपला विश्वास वाटतोय असे ते म्हणाले आहेत.