Haryana Election Result 2024 : भाजपने (Bharatiya Janata Party) हरियाणामध्ये एकहाती विजय मिळवला आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतली आहे. हरियाणात मिळालेल्या विजयानंतर प्रधानमंत्री मोदींनी येथील जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हरियाणातील जनतेचे आभार मानताना पीएम मोदी म्हणाले की, ‘तुम्ही भाजपला मनापासून मतदान केले याबद्दल तुमचे आभार!!! या विजयाचा आवाज दूरपर्यंत जाईल.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले, “हरियाणात सत्य आणि सुशासनाचा विजय म्हणून तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे. गीतेच्या भूमीत सत्याचा विजय झाला आहे. गीतेच्या भूमीत विकासाचा विजय झाला. सुशासनाचा विजय झाला. गीतेच्या भूमीत प्रत्येक जातीच्या लोकांनी आम्हाला मतदान केले आहे.’
पुढे जम्मू आणि काश्मीरबद्दल बोलताना म्हणाले, “दशकांच्या प्रतिक्षेनंतर, अखेर जम्मू-काश्मीरमध्ये शांततापूर्ण निवडणुका झाल्या, मतांची मोजणी झाली आणि निकाल जाहीर झाले. हा भारताच्या संविधानाचा विजय आहे, तसेच हा लोकशाहीचा विजय आहे. असेही मोदी म्हणाले.
तसेच जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या मित्रपक्षांना जास्त मते दिली आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुढे मोदी म्हणाले, मतांच्या टक्केवारीच्या आधारावर, भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करतो.
पुढे भाजपने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवलेल्या हरियाणाबद्दल बोलताना पंतप्रधानम्हणाले, “हरियाणाने विकासाची हमी खोटी हामी देणाऱ्यांवर मात केली आहे. एक नवा इतिहास, यापैकी 10 निवडणुकांमध्ये हरियाणाच्या जनतेने प्रत्येक 5 वर्षांनी सरकार बदलले आहे प्रत्येकी 5 वर्षांच्या दोन टर्म पूर्ण करणाऱ्या सरकारला हरियाणामध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. याबद्दल हरियाणा जनतेचे आभार!!!
भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानताना पंतप्रधान म्हणाल, “हरियाणातील विजय हा पक्ष कार्यकर्त्यांच्या अपार कष्टाचे फळ आहे. हरियाणातील विजय हा (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष) जेपी नड्डा आणि हरियाणा (भाजप) संघाच्या प्रयत्नांचा विजय आहे. हा विजय म्हणजे आपल्या विनम्र मुख्यमंत्री (नायब सिंग सैनी) यांनी केलेल्या कर्तव्याचा विजय आहे.
पुढे काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले, ‘आज संपूर्ण देश पाहत आहे की, काँग्रेस आपल्या समाजात जातीचे विष पसरवत आहे. जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना जातीच्या नावावर गरीबांना एकमेकांविरुद्ध लढवायचे आहे. आपल्या दलित, मागासलेल्या आणि आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना इतकी दशके अन्न, पाणी आणि घरापासून वंचित ठेवले आहे. असा पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.