Vanchit Bahujan Aghadi : पुढील महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपांचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी एका मागोमाग एक बैठका होत आहे. अशातच, प्रकाश आंबडेकरांच्या वंचित बहुजन आघाडीने यात मोठी आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने आज (बुधवारी) दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत.
Vanchit Bahujan Aaghadi announces a list of 10 candidates for the upcoming Maharashtra Assembly elections, scheduled to be held this year. pic.twitter.com/PkW6ygAUlc
— ANI (@ANI) October 9, 2024
वंचितच्या यादीमध्ये सांगली, पुण्यातील हडपसर, कल्याण पश्चिम, औरंगाबाद मध्य, परभणी या प्रमुख मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मलकापूर, बाळापूर, गंगापूर, माण आणि शिरोळ या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे.
मलकापूर विधानसभा मतदारसंघ – शहजाद खान सलीम खान (मुस्लीम)
बाळापूर विधानसभा मतदारसंघ – खातीब सयद नातीक्वाद्दीन (मुस्लीम)
परभणी विधानसभा मतदारसंघ – सयद सामी सय साहेबजान (मुस्लीम)
औरंगाबाद मध्य मतदारसंघ – मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक (मुस्लीम)
गंगापूर विधानसभा मतदारसंघ – सय्यद गुलाम नबी सय्यद (मुस्लीम)
कल्याण पश्चिम मतदारसंघ – अयाज गुलजार मोलवी (मुस्लीम)
हडपसर विधानसभा मतदारसंघ – मोहम्म अफरोज मुल्ला (मुस्लीम)
मान विधानसभा मतदारसंघ – इम्तियाज जफर नदाफ (मुस्लीम)
शिरोळ विधानसभा मतदारसंघ – आरिफ मोहम्मदाली पटेल (मुस्लीम)
सांगली विधानसभा मतदारसंघ – अल्लाउद्दीन हयातचंद काझी (मुस्लीम)
विधानसभा निवडणुक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न सुरू होते. पण सन्मानजनक जागा न दिल्याने वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती.