हिंदू म्हणायला आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. पण काही गारगोट्यांना लाज वाटते. आपण ही शिवसेना मुक्त केली, आझाद शिवसैनिकांची ही आझाद शिवसेना आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो. आज भगवा संचारला आहे. हे सरकार पंधरा दिवस, एक महिना, सहा महिन्यात पडेल, असे म्हणत होते पण एकनाथ शिंदे पुरून उरला. मी घासून-पुसून नाही, ठासून 2 वर्षे पूर्ण केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर मोठ्या जल्लोषात साजरा झाला. त्यात त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे . ते पुढे म्हणाले, तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांसोबत बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्नं कुणी पूर्ण केली, तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. ठाकरे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते, पण हे स्वतःच मुख्यमंत्रीपदी बसले. मोदींनी ते केलं आणि मला मुख्यमंत्री बनवले .
तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला तुमचाच रंग बदलला. अश्या लोकांसमोर बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्न कोणी पूर्ण केली, तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. हे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारे मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते पण हे स्वतःच बसले, मोदींनी ते न करता मला मुख्यमंत्री बनवला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आहेत
जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी होती. धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय. धारावी इथे देखील प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धारावीकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार असेही शिंदे म्हणाले आहेत.