Cabinet Meeting Decision : राज्यात उद्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच आज (सोमवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती सरकारकडून विविध मोठे निर्णय (Cabinet Meeting Decision) घेण्यात आले आहेत.
आजची मंत्रिमंडळांची बैठक होताच शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर LBS मुलुंड मार्ग हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी टोल माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासूनच लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही.
मंत्रिमंडळाची ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यकीय घडामोडींना वेग आला असून सध्या बडे नेते दिल्लीच्या तसेच महाराष्ट्र्राच्या दौऱ्यावर आहेत.